पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी 17 अर्ज माघारी


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : दि.20- पंढरपूर नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेआहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते. यात नगराध्यक्षपदासाठी 6तर नगरसेवक पदासाठी 323 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दि.21 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. 19 रोजी एकह अर्ज माघारी घेण्यात आला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.20 रोजी 17 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. शुक्रवार दि.21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार देण्याचा शेवटचा दिवस आहे.
*यांनी घेतले अर्ज माघारी*
प्रभाग क्र.2 ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर अपक्ष, अश्विनी श्रीनिवास बोरगावकर अपक्ष, प्रभाग क्र.9 ब मधून राजु शमशुद्दीन सत्तारमेकर अपक्ष, जावेद काशिम शेख अपक्ष, सुनिल मोहन अधटराव अपक्ष, प्रभाग क्र.13 अ मधून रुक्मिणी धनाजी धोत्रे अपक्ष, प्रभाग क्र.13 ब मधून राजन बळीराम थोरात अपक्ष, प्रभाग क्र.14 अ मधून शैलजा बाळासाहेब कसबे अपक्ष, प्रतिक्षा ऋषिकेश भालेराव अपक्ष दोन अर्ज, प्रभाग क्र. 14 ब मधून विजय परमेश्वर वरपे अपक्ष, तुळजाराम माणिक धोत्रे अपक्ष, प्रभाग क्र. 17 अ मधून प्रसाद श्रीमंत यादव अपक्ष, उमेश भगवान सर्वगोड अपक्ष, अंबालाल किसन दोडिया अपक्ष, प्रभाग क्र.17 ब मधून उमा संजय घोडके विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी, उमा संजय घोडके अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.



