पंढरपूर नगरपरिषद निवडणुक; नगराध्यक्षपदाचे 8 तर नगरसेकपदाचे 321 अर्ज मंजूर : सीमा होळकर


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.. त्याची मंगळवार दि. 18 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी 08 तर नगरसेवक पदासाठी 366 दाखल उमेदवारी अर्जापैकी 321 मंजूर तर 39 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.तसेच 6 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या या अर्जाची छाननी मंगळवार दि. 18 रोजी नगरपरिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दि.19 ते 21 नोव्हेंबर हा कालावधी असेल. दि. 26 नोव्हें. रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
या वेळेत करण्यात आली छाननी-
सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष व प्रभाग क्र. 1 चे अर्ज, सकाळी 11.30 वाजता प्रभाग क्र.2, दुपारी 12.05 वाजता प्रभाग क्र.3 व 4, दुपारी 1 वाजता प्रभाग 5 व 6, दुपारी 1.30 वाजता प्रभाग क्र.7 व 8, दुपारी 2 वाजता प्रभाग क्र.9 व 10, दुपारी 3 वाजता प्रभाग क्र.11 व 12, दुपारी 3.30 वाजता प्रभाग क्र.13 व 14, दुपारी 4 वाजत प्रभाग क्र.15 व 16 तर सायंकाळी 4.30 वाजता प्रभाग क्र.17 व 18 मधील उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.
…..

