डॉ.वामन साळवे यांची शिक्षक विकास परिषदेचे उपाध्यक्षपदी निवड

डॉ.वामन साळवे यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष रमेश कुळकर्णी व इतर मान्यवर
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
इचलकरंजी : १६/०२/२०२५,शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डाॅ.वामन निंबाजी साळवे यांची राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक विकास परिषदेचे उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी यांनी नुतन कार्यकारिणी सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.पणजी येथे (दि. १४/०२ रोजी) शिक्षक विकास परिषदेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत २०२५-३० या कालावधीसाठी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.

अध्यक्ष रमेश कुळकर्णी, उपाध्यक्ष डॉ. वामन साळवे, उपाध्यक्षा सौ. पुष्पा गायतोंडे, खजिनदार दौलतराव खानविलकर, सचिव मारुती कुंभार, सहसचिव सातु वेळीप, सदस्य श्रीमती माधुरी गांवस, सौ.ऐलन बोरजिस, शंकर बुडके, पद्मनाभ देसाई, सौ.सुलभा देसाई, सौ.रेणुका फळदेसाई, सौ.कुसुम साळकर, सौ.प्रतिभा प्रभुगावकर. यावेळी सुरज नाईक, पांडुरंग सुतार, व्हि.के. महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते.पांडुरंग बखले यांनी आभार मानले.




