मानवी मूल्य संविधान मूल्या आधारे जीवन जगत साहित्य आविष्कार करावेत :चंद्रप्रकाश शिंदे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
हिंगणघाट :-मानवी मूल्य संविधान मूल्या आधारे जीवन जगत साहित्य आविष्कार करावेत असे विचार चंद्रप्रकाश शिंदे(अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.राज्य) यांनी व्यक्त केले.जीवन प्रणाली प्रतिष्ठान संचलीत मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र व्दारा संविधान अमृत वर्षानिमित्त विदर्भ विभागीय कविसंमेलनाच्या उद्घघाटन सत्राचा अध्यक्षीय समरोप करताना ते बोलत होते.
दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ वेळः दुपारी १२ ते सायंकाळी ५.०० विरांगणा महाराणी दुर्गावती भवन, तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ, हिंगणघाट जि. वर्धा. येथे हॆ संमेलन पार पडले
या संमेलनाचे ..उद्घघाटन सुशमा पाखरे प्रसिद्ध विचारवंत वर्धा यांचे हस्ते झाले.त्यांनी आपले विचार मांडताना संविधानिक संरक्षणामुळे आम्हाला अधिकार प्राप्त झालेले आहेत. तेव्हा लोकशाही प्रणाली जीवन प्रणाली बनली पाहीजे. असे स्पष्ट केले.प्रमुख पाहूणे माजिद बेग मुगल यांनी संविधान बाह्य कृति सामूहिक संघर्ष करावा आसल्याचे प्रतिपादन केले.
संविधान अमृत वर्षानिमित्त मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र व्दारा कविसंमेलनाच्या शृंखलेतील दुसरे विदर्भ विभागीय कविसंमेलनात उपस्थित साहित्यिक व साहित्य रसिकांनी संविधाना प्रती दाद दिल्या बद्दल आभिनंदन प्रस्ताविक . डी.जी. वाळवंटे (अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.परभणी) यांनी केले.
प्रा.डॉ.गजानन सयाम यांनी शब्दाचे सामर्थ लक्षात घेउन त्याचा उपयोग साहित्यिकांनी संविधान व लोकशाही दृढ होण्यासाठी करावा असे स्पष्ट केले.सुत्रसंचालन सुनिल गायकवाड( सचिव. प्र.सृ.सा.प.महा.राज्य ) यांनी प्रभावीपणे केले.
कविसंमेलनात जवळपास 35 प्रतिभासंपन्न कविचा सहभाग झालेला होता त्यांनी बहारदार कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन देविलाल रौराळे(अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.आमरावती )व आम्रपाली पारवे(सचिव मा.प्र.सृ.सा.प.वर्धा यांनी उत्कृष्ट पणे केले
कविसंमेलनाचे अध्यक्ष योगीराज कोचाडे(सह सचिव मा.प्र.सृ.सा.प.मह) यांच्या काव्याने अध्यक्षीय समारोप झाला.शेवटी.रवि कोकुर्डे हिंगणघाट यानी आभारप्रदर्शन मानले.
.