Uncategorized

मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्हा यांच्यावतीने MPSC मध्ये यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार… 

मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्हा यांच्यावतीने MPSC मध्ये यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार…

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

सोलापूर :-दि १५  फेब्रुवारी २०२५ रोजी मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्हा यांच्या वतीने एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रमेश बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला..यावेळी उपस्थित श्रीकांत देडे,प्रभाकर कांबळे, मसुदेव रणदिवे, विकी पवार, आदिनाथ उडानशिवे, महेश जाधव, रमेश पाटोळे  शंकर भोसले, शिवाजी गायकवाड  हिरा आडगळे,महेश भालेराव आदी उपस्थित होते.

कु सरोजनी ज्योतीराम भोजने MPSC उत्तीर्ण (सोलापूर) कु. संजीवनी ज्योतीराम भोजनेMPSC उत्तीर्ण (सोलापूर) मुकुंद बाळासाहेब होळकर MPSC उत्तीर्ण एकरुख ता.उत्तर सोलापूर विजया नारायणकर मार्डी ता.उत्तर सोलापूरविद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव 2024 यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला..

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा फेटा पंचशील उपरने व भारतीय संविधानाचे उद्देशिका देऊन सौ राधा शंकर भोसले यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला..

तसेच समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचाही फेटा बांधून सत्कार करण्यात आला…

या कार्यक्रमावेळी  युवराज पवार व ऍड.शैलेश पोटफोडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले

MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्हा यांनी आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही समितीचे ऋणी आहोत असे म्हणाले..

राजू क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close