Uncategorized

अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा मतदार संघातील नागरिकांचा निर्धार

शेतकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा- नितीन कापसे

सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना साथ द्या- ज्योतीताई कुलकर्णी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारे आणि माढ्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार माढा मतदार संघातील जनतेने केला असल्याचे प्रगतीशील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी सांगितले.

माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना अभिजीत पाटील यांना मतदार संघातील प्रमुख नेते मंडळी आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

केवड, बुद्रुकवाडी, धानोरे, कापसेवाडी, वाकाव, उपळाई खुर्द, वडाचीवाडी, रोपळे खुर्द, उपळाई बुद्रुक, अंजनगाव खेलोबा या ठिकाणी गावात प्रचार दौरा पार पडला..
आधी केले मग सांगितले या उक्ती प्रमाणे अभिजीत पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक नुकसान सहन करून कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून बेड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच राज्यातील नागरिकांसाठी आर्थिक नुकसान करून ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून नागरिकांचा जीव वाचवण्याचे पुण्याचे काम केले आहे. राज्यात ऊस दराची स्पर्धा लावून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी काम केले आहे. याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचे ज्योती कुलकर्णी यांनी सांगितले.

माढा विधानसभा मतदारसंघात कमी वेळात त्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. याची दखल घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना माढा विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ते विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असलेल्या विकास कामांवर विद्यमान आमदारांवर आरोप करत असले तरी त्यावर ते माढ्याचे व्हिजन सांगून उपायही सांगत आहेत. कोणताही राजकीय वारसा नसतानाही केलेल्या कामांमुळे मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवून माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदार संघातील नागरिकांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close