डॉ. सिकंदर ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

डॉ. सिकंदर ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देवून सन्मानित करताना ना. उदय सामंत, ना. योगेश कदम, आ. ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुभाषराव माने आदी.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे 63 वे अधिवेशन नुकतेच दापोली, जि. रत्नागिरी येथे संपन्न झाले. यामध्ये पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सिकंदर ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या अधिवेशानमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन पुरुष व एक महिला मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सिकंदर ढवळे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री ना. योगाश कदम, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे प्राचार्य सुभाषराव माने यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रथम अधिवेशनाचे अध्यक्ष सुनिल पंडीत, महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, डॉ. बी. एम. हिरडेकर, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य तानाजी माने, माजी अध्यक्ष सुभाष माने, जे. के. पाटील, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, आर. व्ही. पाटील, गोपाल पाटील, कोकण व कोल्हापूर विभागीय महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
डॉ. सिकंदर ढवळे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ नियंत्रकसमितीचे अध्यक्ष सुभाषराव माने, रंगसिध्द दसाडे, सिद्राम खट्टे, रेवणसिध्द रोडगीकर, तानाजी माने, प्राचार्य महेश सरवदे, अमोल चव्हाण, पी.जे सावंत, बापू नीळ, श्रावण बिराजदार, उत्तम कोकरे, संगिता शिंदे, , श्रीशैल पाटील, सुरेश गुंड, सुभाष घुले, पंढरीनाथ माने, विजयकुमार वाघमोडे, ज्योत्स्ना डोके शामराव कोळवले, प्राचार्य अशोकानंद राक्षे ,उत्तम लवटे ,वैभव साळुंके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



