Uncategorized
महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप
भीम क्रांती तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील प्रतापसिंह विद्यालय येथील हुशार, गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप भीम क्रांती तरुण मंडळ चांदापुरी या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यास १ सॅक, १२ स्कॉयर वह्या,१ कंपास पेटी,१पेन बॉक्स तसेच ९ वी व १० वीतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी भीम क्रांती तरुण मंडळाचे
अक्षय देठे, समाधान साबळे,दिलीप सरतापे, बापूसाहेब लोखंडे, सागर सरतापे, हेमंत जाधव, तसेच शाळेचे यादव सर, मेनकुदळे सर, डी. एस. धांडोरे सर, नरूटे सर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी समाधान साबळे, अक्षय देठे, डी.एस. धांडोरे सर तसेच मेनकुदळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शेवटी विद्यालयाच्या वतीने यादव सर यांनी भीमक्रांती तरुण मंडळाचे आभार मानले.




