Uncategorized
दिलीपबापू धोत्रे यांनी केला गावाभेटीचा झंजावत सुरु
शेतकऱ्यांचा उस श्री विठ्ठलाला गाळपासाठी नेणार व चांगला दर देणार -दिलीपबापू धोत्रे


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी झाल्यापासून त्यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामधून आपला गाव भेटीचा झंजावात सुरू केला आहे खर्डी येथील सिताराम महाराजांच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
दिलीपबापू धोत्रे यांनी आपल्या गाव भेटीच्या दौऱ्यामध्ये खर्डी,तपकीर, शेटफळ, तनाळी आदी गावांमधून आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली असून प्रणाली या गावी आज गाव भेटीचा दौरा केला असता तनाळी येथील ऊस उत्पादक शेतकरी तसेच तरुण बेरोजगार आणि असंख्य महिलांना संबोधित करत असताना ते म्हणाले की शेतकरी बांधवांनो तुम्ही घेऊ नका मी तुमचा ऊस श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला घालवणार आहेत तेथील चेअरमन अभिजीत पाटील हे माझे मित्र असून त्या कारखान्याला तुमचा ऊस गाळपासाठी घालवून देणार आहे आणि चांगला उसाचा दर देखील देणार आहे असे आश्वासन त्यांनी त्यांनाही या ठिकाणी गाव भेटीच्या माध्यमातून प्रचारास सुरुवात केली असता त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
या गाव भेटीच्या कार्यक्रमाच्या वेळी दिलीपबापू धोत्रे यांच्यासोबत नाना कदम शशिकांत घाडगे संतोष कवडे ऍड यासीन शेख तसेच गणेश पिंपळनेर आदी मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
आज पर्यंत आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी व आमदारांनी ऊस कारखान्याच्या माध्यमातून फक्त राजकारण केले गेलेले आहे शेतकऱ्यांची पिळवणूक त्याचप्रमाणे त्यांना गरिबीमध्ये दारिद्र्यांमध्ये कितपत ठेवण्याचे काम या आजी-माजी आमदारांनी केलेले आहे परंतु यापुढे शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ देणार नाही त्यांचे आर्थिक शोषण करू दिले जाणार नाही काही जरी अडचण शेतकरी बांधवांना आधी तर मला सांगा मी आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील माझ्या माता भगिनी या आर्थिक बाबतीत सक्षम झाल्या पाहिजेत या विचाराचा मी असून महिलांच्या लघु उद्योगाला तसेच त्यांच्या बचत गटाला आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन मी देत आहे महिलांनी आपल्या घरगुती उद्योगाच्या माध्यमातून दोन पैसे मिळवावेत ही माझी भावना असून त्यानिमित्ताने येणाऱ्या दीपावलीच्या सणानिमित्त पंढरपूर येथे टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी घरगुती खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे आकाश कंदील व अन्य दिवाळीनिमित्त चे साहित्य विक्रीसाठी चे स्टॉल विकून 200 स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत या स्टॉल साठी महिलांना भाडे आकारले जाणार नाही ज्या महिलांना आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा महिलांना आम्ही अर्थसहाय्य करणार आहोत असे देखील दिलीप बापू धोत्रे यांनी आज त्यांना या गावी हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचार गौरीच्या वेळी जमलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले.
माझ्या माता भगिनींना मी घरी जाऊन भाऊबीजेची भेट देणार आहे न्य पुढार्यांप्रमाणे चावडीवर बोलवून प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने हलक्या दर्जाच्या साडी वाटपाचा कार्यक्रम मी करणार नाही असे देखील खोचक टीका त्यांनी विरोधकांच्यावर केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलीप बापू धोत्रे यांच्या भेटीचा झंजावातामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आजी-माजी आमदार व भावी आमदार यांना दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी ही अडचणी ठरणार आहे असे या ठिकाणी असलेले ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.



