Uncategorized

मनसे नेत्या शालिनीताई ठाकरे पंढरपूरच्या दौऱ्यावर

शिक्षण क्षेत्रातील गुणवंतचा 6आक्टोबरला होणार सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरीय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

येत्या रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता शेठ मोरारजी कानजी सभागृह- स्टेशन रोड पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनसे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय चित्रे,मनसे नेते राजा चौगुले, मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे शहर मनसे महिला अध्यक्ष वनिता वागस्कर, मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, मनसे लोकसभेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक केले जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close