पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदी रमेश खारे तर सरचिटणीसपदी सुनिल अडगळे यांची निवड.


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या शाखा पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये शिक्षक समितीच्या नूतन पंढरपूर तालुका अध्यक्षपदी रमेश खारे व नूतन सरचिटणीसपदी सुनिल अडगळे यांची बहुमताने निवड करण्यात आली. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी अध्यक्ष रमेश खारे व सरचिटणीस सुनिल अडगळे यांचा सत्कार करुन निवडपत्र दिले व पुढील संघटनात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार समाधानदादा अवताडे यांनी ‘शिक्षक समिती ही एक लढवय्यी व तत्वनिष्ठतेने काम करणारी शिक्षक संघटना असून शिक्षक-बंधूभागिनी यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारणारी धाडसी संघटना आहे,असे मत व्यक्त करताना मी कायम आपल्या सोबत असेन,असे आश्वासन ही दिले.
डॉ.सचिन लादे सर यांनी उपस्थित मान्यवर व शिक्षक-बंधूभागिनी यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकात मावळते तालुकाध्यक्ष सुनिल कोरे सर यांनी गेली 13 वर्ष केलेली शिक्षकसेवा,संघटनात्मक कार्य व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिलेली मौलिक साथ याबद्दल सर्वाचे आभार मानले.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या मा.सभापती सौ. रजनीताई देशमुख यांनी तालुकाध्यक्ष व सरचिटणीस हे दोन्ही महत्वपूर्ण पदे करकंब भागातील धडपडे व कार्यकुशल शिक्षकांना दिल्याबद्दल संघटनेचे आभार मानून दोघांना ही संघटना कामासाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली,नूतन पदाधिकाऱ्यांच्या आजपर्यंतच्या लढवय्या कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करून पुढील संघटनात्मक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.
आभार मा.सरचिटणीस पोपट कापसे यांनी मानले.
यावेळी नूतन जिल्हा उपाध्यक्ष पोपट कापसे जिल्हा संपर्क प्रमुख आण्णासाहेब रायजादे व प्रवक्ते राजेंद्र खपाले सर यांचा आमदार समाधान आवताडे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य अनिल बंडगर,जिल्हाध्यक्ष सुरेश पवार,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे,शिक्षक समितीचे नेते सचिन लादे, अमोगसिद्ध कोळी,चेअरमन विष्णू नरळे,व्हा.चेअरमनसंगिता कापसे, संचालक रावण मदने, दत्तात्रय खंदारे, दत्तात्रय हेंबाडे,संतोष कांबळे,विजयकुमार,जाधव हेमंत माने,स्नेहल आमले,सचिव संतोष थोरात,सुरशेन बुधवंतराव,जयवंत कापसे, संतोष कापसे, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा इंगळे, सरचिटणीस अर्चना कोळी, चंद्रकला खंदारे, मा.चेअरमन बालाजी शिंदे,नवनाथ कवडे,आवेश करकमकर,गुंडिबा कांबळे,ज्ञानेश्वर मोरे, शिवाजी जाधव, अविनाश बुरांडे, शरद गावडे, रमेश गावडे, सारिका फासे, योगिता अडगळे,सुजाता गुरसाळकर, मंजिरी देशपांडे,संपदा परळीकर,भाग्यश्री अवधूत, सुप्रिया आमले तसेच राज्य,जिल्हा,तालुका पातळीवरील शिक्षक समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.



