Uncategorized

“चांडाळ चौकडीच्या कारामती” वेब सिरीजची 250व्या भागाकडे वाटचाल 

चांडाळ चौकडीच्या कारामती वेब सिरीजच्या कलवांताची अविस्मरणीय भेट

रामभाऊ जगताप, भारत शिंदे (बाळासाहेब ).. सोबत आबा कांबळे, श्रीकांत कसबे संपादक , बापू कांबळे, संजय कांबळे गायत्री कांबळे नंदामामी विटेकर 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 शब्दांकन -श्रीकांत कसबे

पंढरपूर :-चांडाळ चौकडीच्या कारामती ही विनोदी वेबसिरीज सध्या यु ट्यूब वर धुमाकूळ घालत आहे.सर्व कलावंत कांबळेश्वर ता. बारामती येथील असून मालिकेचे चित्रीकरण बहुतांशी कांबळेश्वर येथे केले असून 249 भाग प्रदर्शित झाले आहेत.अनेक सामाजिक विषय विनोदी पद्धतीने सादर करण्याची हातोटी त्यांना जमली असून मालिका अत्यंत लोकप्रिय झाली आहे.


रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोमेश्वर येथील एका कार्यक्रमासाठी फलटण मार्गे सांगवी होळ जिंती मार्गे मी,लक्ष्मण (आबा )कांबळे, बापू कांबळे (मामा )संजय कांबळे, कुटुंबातील माहिलासह गेलो. आबा कांबळे ड्रायव्हिंग करत होता. जाताना त्याने कांबळेश्वर कडे जाणारा दिशा दर्शक बोर्ड बघितला. त्याच्या आवडीची मालिका ” चांडाळ चौकडीच्या कारामती” मध्ये येथील कलाकार आहेत त्यांची भेट येताना घ्यायची असे ठरले.

गणेश लोणकर आण्णा… सोबत आबा कांबळे, श्रीकांत कसबे 

ठरल्याप्रमाणे कांबळेश्वरला आलो.तेथे कलाकारांविषयीं चॊकशी केली. तर शूटिंगची तयारी असून सर्व कलाकार जमले आहेत अशी माहिती मिळाली.त्या ठिकांनी पोहचलो. यावेळी रामभाऊ जगताप, भारत शिंदे (बाळासाहेब ), प्रा .विष्णू भारती (पाटील )सुभाष मदने,(तंटामुक्ती अध्यक्ष )संजय खलाटे (संजू मेम्बर )उज्जन पवार, अमीर अहिवळे, गणेश लोणकर (आण्णा ) यांची भेट झाली.

सुभाष मदने … सोबत आबा कांबळे, श्रीकांत कसबे 

प्रा. विष्णू भारती (पाटिल )… सोबत आबा कांबळे,

संजय खलाटे (संजू मेम्बर ). सोबत आबा कांबळे, गायत्री कांबळे 

त्यांनी आपुलकीने आमची चौकशी केली.बसण्यासाठी खुर्च्या दिल्या. सरबत मागवीला, इकडील तिकडील साधक बाधक चर्चा झाली. नंतर ग्रुप फोटोसेशन झाले. त्यांना सांगवी येथे 250व्या भागाचे शुटिंग साठी जायचे होते. तें सर्व युनिट सह सांगवीकडे गेले. व आम्ही पंढरपूरकडे….

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close