जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल ची मोठ्या दिमाखात सुरुवात
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)

पंढरपूर प्रतिनिधि/ महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने साप्ताहिक जोशाबा टाइम्सच्या वतीने जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले स्मारक पंढरपूर येथे करण्यात आले. यावेळी संपादक श्रीकांत कसबे, जोशाबा ग्रुपचे अंबादास वायदंडे, भीमराव वाघमारे, रवी सर्वगोड, धनंजय खिलारे, संजय आडगळे, नगरसेवक संजय निंबाळकर, शिकंदर बागवान, मालोजी शेंबडे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमराव वाघमारे यांनी क्लिक करून या वेबसाईटचे उद्घाटन केले. यावेळी भीमराव वाघमारे यांनी शुभेच्छा देताना जनतेच्या सेवेसाठी हे वेब चॅनल सुरू झाले असून त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे व सर्वांचा बुलंद आवाज म्हणून येत्या काळात निश्चितच जोशाबा टाइम्स वेब न्यूज चॅनल यशस्वी होईल अशा शुभेच्छा दिल्या.



