Uncategorized
अथर्व सोनार याचे दुःखद निधन…’

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक किरण वसंत सोनार (दहिवाळ) यांचे कनिष्ठ चिरंजीव अथर्व सोनार याचे वयाच्या अठराव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. तो बारावी मध्ये शिकत होता. पहिलीपासून ते बारावी पर्यंत शिकत असताना प्रत्येक इयत्तेमध्ये तो शिक्षकांना प्रिय होता. तसेच त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. अथर्व सोनार याच्या अचानक झालेल्या निधनामुळे पंढरपूर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, संस्कृतिक या व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ व इतर परिवार आहे.


