परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासंदर्भात पंढरपुरात मार्गदर्शन शिबिर

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर: यावर्षी 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत सहभाग घेतला होता. महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबद्दलची अनिश्चितता लक्षात घेता, अनेक विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छितात. या संदर्भात विद्यार्थी पालकांना परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधीबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने रशियन मेडिकल एज्युकेशन एजन्सी संस्थेच्या वतीने पंढरपूरमध्ये हॉटेल धनश्री मार्केट यार्डसमोर येथे रविवारी 07/07/2024 रोजी सकाळी ११ वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण दोरखे, सल्लागार फिजिशन डॉ. शैलेश कांचन-पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमेय नारकर मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरामध्ये परदेशातील नामांकित विद्यापीठांची माहिती त्यांचे शुल्क, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, राहण्याची व जेवणाची अशा अनेक सुविधांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे: अधिक माहितीसाठी 9860686308 तसेय 7219416041 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.