फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचा “मनुस्मृतीचा” शालेय अभ्यासक्रमात समावेशला विरोध !
त्वरीत निर्णय रद्द करावा या मागणीचे तहसीलदार यांना दिले निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तयार केलेला अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण )2024मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने हरकत नोंदविली असून इयत्ता 3री ते 12पर्यंत शालेय अभ्यास क्रमात मनुस्मृती, दासबोध, याचा जाणीवपूर्वक समावेश करुन शासन भारतीय संविधान मूलभूत अधिकार कलम 14,15,17,19,21,28 बेकायदेशीर व असंविधानिक आहे म्हणुन त्याचा अभ्यासक्रमात करू नये या मागणीचे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी वर्षा डोंबाळे मॅडम यांना निवेदन दिले असून सकारात्मक विचार न झालेस राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना विचारमंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे म्हणाले की, महायुती सरकार जाणीवपूर्वक संविधानाची मोडतोड करीत असून भारतात शाळा, महाविद्यालय यांना सरकार अनुदान देत असून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती, दासबोध, भगवंदगीता याचा समावेश करीत आहे.कुठल्याही एका धर्माचा प्रचार, प्रसार करुन संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या समतेला छेद देणारे शिक्षण देऊन विषमतामय वातावरण करुन बहुजन समाजातील विध्यार्थ्यांना बुद्दू बनविण्याचा कार्यक्रम आखाला आहे. धर्माचे विषारी रसायन देऊन अज्ञानाची संस्कृती विकसित करणे देवभोळेपणा,अंधश्रद्धा वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. धर्माचे प्रकटिकरण करुन देश धर्मनिरपेक्ष असून संविधानाने दिलेल्या समता स्वातंत्र्य, बंधुता याला छेद देणारे व संविधान विरोधी असल्याने यास आमचा तीव्र विरोध आहे.

शासनाने त्वरित निर्णय बदलवा अन्यथा राज्यभर जन आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. यावेळी विचारमंचाचे सल्लागार आर. पी. कांबळे, श्रीकांत कसबे, सदस्य राजेंद्र पाराध्ये, दादासाहेब दोडके, सागर गायकवाड, किशोर दंदाडे, ऍड. किशोर खिलारे, चंद्रकांत सातपुते,मोहन कडलाग आदी उपस्थित होते.


