Uncategorized

न्याक(NAAC) मूल्यांकनामध्ये आटपाडीतील आर्ट्स अँड सायन्स कॉलेजला “बी” ग्रेड प्राप्त…

श्रीराम बहुउद्देशी सेवाभावी संस्थेच्या कार्यात मानाचा तुरा...

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

डॉ रामदास नाईकनवरे  सांगली जिल्हा प्रतिनिधी 

————————–
आटपाडी :-शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आटपाडी. या महाविद्यालयास युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन संलग्नित असणाऱ्या समितीने बी ग्रेड देऊन सन्मानित केले आहे. न्याक (NAAC) ही भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भारतातील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना मूल्यांकन करून दर्जात्मक मान्यता देते. या न्याक(NAAC) समितीचे मुख्य ऑफिस बेंगलोर येथे आहे.
दि. 22 व 23 एप्रिल 2024 रोजी न्याक(NAAC) समितीने सदर महाविद्यालयास भेट देऊन त्यांनी आपला अहवाल बेंगलोर येथील न्याकच्या मुख्य कार्यालयास सादर केला होता. त्यानंतर दि. 5/ 4// 2024 रोजी या कार्यालयाकडून आपल्या महाविद्यालयास बीग्रेड मिळाली असल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात आले.
या न्याक (NAAC) समितीमध्ये छत्तीसगड येथील प्रा. डॉ. उमा गोळे- चेअरमन, (रविशंकर शुक्ला युनिव्हर्सिटी रायपुर), सदस्य व को- कॉर्डिनेटर प्रा. डॉ. जयचंद्र आर. (डायरेक्टर केरळ विद्यापीठ), सदस्य – प्रा .डॉ. अनिल कुमार सुरेंद्रिया.( प्राचार्य, शिवानंद शर्मा मेमोरियल कॉलेज बेंगलोर) इत्यादी मान्यवरांचा सामावेश होता.
आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आटपाडी हे आटपाडी तालुक्यातील व माणदेशातील नामांकित महाविद्यालय आहे. सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्यातील आटपाडीसह जत, कवठेमंकाळ, तासगाव, माळशिरस, पंढरपूर व सांगोला इत्यादी तालुक्यातील असंख्य विद्यार्थी – विद्यार्थिनी या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करतात. कायम विनाअनुदानित असणाऱ्या या महाविद्यालयास न्याक (NAAC) समितीकडून बीग्रेड मिळाल्याने श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, श्री. तानाजीराव पाटील व सचिव, श्री. शिवाजीराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
या न्याक (NAAC) मुल्यांकन कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री. तानाजीराव पाटील व सचिव,शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रामदास नाईकनवरे व न्याक को – ऑर्डिनेटर प्रा. शिवदास टिंगरे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, या कार्यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले जुनोनी महाविद्यालयाचे प्रा. तानाजी लवटे, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. संतोष सावंत, डॉ. सुधाकर भोसले, प्रा. बालाजी वाघमोडे , डॉ. बाळासाहेब कदम, डॉ. भारती देशमुखे, प्रा. सचिन सरक, प्रा. धनाजी गायकवाड, प्रा. सारिका घाडगे, प्रा. आकाश जाधव , ग्रंथपाल पुजारी,. संभाजी चव्हाण, श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. सुजित सपाटे, प्रा. आप्पासाहेब हातेकर, प्रा. अनिता निकम, प्रा. माधुरी मोरे, प्रा. अश्विनी भगत , प्रा. दिपाली अडसूळ , प्रा. सोनाली चौगुले, टेक्निशियन समीर कुलकर्णी, वरिष्ठ लेखनिक. विश्वेश्वर खंदारे, . एस. एम. पाटील, श्री . नागेश कुंभार, श्री. गणेश केदार, . मारुती हेगडे,  गोविंद चव्हाण, इत्यादींचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close