Uncategorized

यापुढे निवडणुकाच होणार नाहीत मोदींचा हुकूमशाही आणण्याचा डाव –माजी मंत्री रमेश बागवे

मातंग समाज प्रणिती शिंदे मागे खंबीरपणे उभा राहणार मातंग एकता आंदोलन कार्यकर्ता मेळाव्यात झाला निर्णय

 

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकारने संविधान मोडीत काढून हुकूमशाही मार्गाने काम करण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव नाही झाला तर या पुढे देशात निवडणुकाच होणार नाहीत. हुकूमशाही राजवट येणार असुन पुन्हा गळ्यात गाडगे येणार आहे याची जाणीव ठेवून मातंग समाजाने काँग्रेसला मतदान करुन भाजपचा पराभव केला पाहिजे
असे आवाहन मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी केले. ते मातंग एकता आंदोलनाचे वतीने तनपुरे महाराज मठातील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.


पुढे बोलतांना ते म्हणाले की,सुशीलकुमार शिंदे हें महाराष्ट्राची अस्मिता असून यांचे मुख्यमंत्री काळात मातंग आयोग स्थापन झाला होता. त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून त्यांची सुशिक्षित, सुसंस्कृत अभ्यासू कन्या प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेची निवडणूक लढत असून त्यांना आपण मतदान केले पाहिजे असे सांगुन त्यांनी मोदी व सरकारवर कडाडून टीका केली. घटनात्मक मार्गाने चालणारे शेतकऱ्याचे आंदोलन मोडून काढले. मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या जमाववर गाडी घालून चिरडून मारले..असे आरोप बागवे यांनी केले.
पुढे बागवे म्हणाले की महिला बाबत कमालीची चीड मोदींना असल्याचे दिसते. महिलांच्या नावावर 15लाख टाकतो म्हणाले पण निव्वळ जुमलेबाजी केली. भाजप खासदारविरोधात महिला कुस्तीपट्टू लैगिक अत्याचारबाबत न्याय मिळावा उपोषणास बसल्या पण त्यांना न्याय तर मिळाला नाहीच पण त्यांची बदनामी केली. खिल्ली उडवली. मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढली मणिपूर पेटले पण मोदींनी ब्र शब्द काढला नाही किंवा मणिपूरला साधी भेट सुद्धा दिली नाही. विकास कामे केली नाहीत महागाई कमी करणे बाबत कोणती योजना केली नाही. दर वर्षी दोन कोट नोकऱ्या देण्याची घोषणा केली. त्याबाबत काम केलेच नाही उलट खासगीकरण करण्याचा व कॉन्ट्रॅक्टवर नेमणूका सुरु केल्या.

देवेंद्र फडणवीसवर टीका करताना बागवे म्हणाले की आमदार, खासदार विकत घेऊन विरोधकांची सरकारे पाडणे, घर फोडने, पक्ष फोडने हीच कामगिरी फडणवीस यांनी केली आहे.
मी सुद्धा हिंदू आहें पण उंबऱ्याच्या आत. धर्माचे राजकारण करुन हिंदू मुस्लिम फूट पाडून दंगल घडविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.पण सर्व धर्माला एकत्र घेऊन कांग्रेस वाटचाल करत आहें. शूद्र राजकारणासाठी मोदींनी पंतप्रधान पदाची शान घालवली आहें. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना पराभूत करण्याची संधी आपणास मिळाली आहें.
मातंग समाजाला लोकसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रात कोठेच संधी दिली नाही अशी खंत व्यक्त करुन ही वेळ राष्ट्रीय प्रश्नांची असून जात व धर्मा पेक्षा राष्ट्र महत्वाचे आहें मोदी नावाचे राष्ट्रीय संकट दूर करायचे आहे. काँग्रेस पक्ष निश्चितच मातंग समाजाचे प्रश्न सोडवेल असा विश्वास बागवे यांनी व्यक्त करुन प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन बागवे यांनी केले.

यावेळी ऍड. पल्लवी रेणके(महिला आयोग माजी सदस्य )
दिलीप साबळे(सामाजिक कार्यकर्ते )
बजरंग बागल (माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस )
विजय काळे(राज्य सदस्य राष्ट्रवादी व्यापारी व उद्योग आघाडी )
सुभाष भोसले(माजी नगराध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)संदीप मांडवे (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार )तानाजी रणदिवे( सामाजिक कार्यकर्ते,सुस्ते )सोनबा वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते )नागेश फाटे( प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी व्यापार व उद्योग आघाडी )बंडू मोरे( आप )किशोर जाधव( जिल्हा सरचिटणीस काँग्रेस आय ) यांनी आपली मनोगते व्यक्त करुन प्रणिती ताई शिंदे व धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन सविता दुधभाते यांनी केले.प्रास्ताविक शहराध्यक्ष शाम मस्के यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सुरेश मस्के यांनी मानले

कार्यक्रमाचे सुरुवातीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांचे हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नागेश गंगेकर (जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस )अमर सूर्यवंशी (शहराध्यक्ष काँग्रेस आय )नागेश आधटराव, बापूसाहेब अवघडे, सौ. सुनीता अवघडे, अमित अवघडे, मल्हारी फाळके,माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, सुरेश पाटोळे (लहुजी शक्ती सेना ) जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश साठे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मातंग एकता आंदोलनाचे तालुका उपाध्यक्ष बाजीराव कांबळे लहू देवकुळे, सागर मस्के गहिनीनाथ वाघमारे, संजय वाघमारे, आकाश कसबे, योगेश मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close