पुरोगामी संघर्ष परिषदेचे समाज कल्याण आयुक्त डाँ. प्रशांत नारनवरे यांना निवेदन
विवीध मागण्याचा परिषदेने केला पाठपुरावा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कराड:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना वाटेगाव (ता.वाळवा) येथे सल्लागार कमिटीचे राज्य अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.
सदर निवेदनात कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेमधील अटी शिथिल करण्यात याव्यात, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांची चौकशी होऊन मागासवर्गीय सभासदांच्या नावावर संस्था मिळवणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आणि मातंग समाजासाठी औद्योगिक सहकारी संस्थांचा ३५% टक्के राखीव कोटा ठेवावा अशा मागण्या करण्यात आल्या.
त्याअगोदर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महामंत्री मारुतीराव बोभाटे, राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, राज्याचे सरचिटणीस युवराज सोनवले,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष( युवक) अंकुष भोंडे, पश्चिम महाराष्ट्राचे बँड बँजो आघाडीचेचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत ,पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सुभाषराव साळुंखे या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या बरोबर सखोल चर्चा केली.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कराड तालुक्याचे अध्यक्ष शंकर चव्हाण, महिला आघाडीच्या कराड तालुका अध्यक्षा सुकेशिनी साठे ,मधुकर साठे ,आबा साठे, अधिकराव चव्हाण, रमेश साठे ,संतोष साठे, आनंद साठे, चंद्रकांत साठे, कुसुम साठे ,कराड तालुका उपाध्यक्ष रमेश साठे, कराड तालुका सरचिटणीस आकाश नेटके इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






