Uncategorized

फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने सामाजिक पुरस्कार प्राप्त मान्यवारांचा सत्कार

20 मार्च महाड सत्याग्रह दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने 20 मार्च महाड सत्याग्रह दिनानिमित्त सामाजिक पुरस्कार प्राप्त मान्यवारांचा सत्कार समारंभ आज संपन्न झाला.थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय  अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार प्रा.सुरेखाताई भालेराव नागटिळक यांचा  शाल बुके व ट्रॉफी  देवून   मंचाचे अध्यक्ष सुनिल वाघमारे यांचे हस्ते  सन्मान करण्यात आला. तर महाराष्ट्र शासनाचा डॉ.. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार प्रविण दत्तात्रय माने  यांना नुकताच प्रदान झाला.. म्हणुन त्यांचा सन्मान शाल बुके व ट्रॉफी  देवून    मंचाचे सल्लागार .एल एस सोनकांबळे करणेत आला.

यावेळी विचारमंचाचे  सल्लागार जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे यांनी मनोगताद्वारे पूरस्कार प्राप्त सुरेखाताई व प्रवीण माने यांचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय  पुरस्कार जरी मिळाला असला तरी आपल्या माणसाने कौतुक करणे हें निश्चित आनंद देणारे व अभिमान वाटणारे आहें अशा भावना सुरेखाताई यांनी व्यक्त करुन सन्मान केलेबद्दल आभार व्यक्त केले.

प्रवीण माने यांनीही  आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करुन सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.

तर अध्यक्षीय भाषणात सुनील वाघमारे यांनी महाड सत्यग्रहाचे महत्व आपल्या शैलीतून सांगितले. व सत्कार मूर्तीचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांना पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे अभिनंदन केले.

सूत्रसंचालन व प्रास्तावीक श्रीकांत कसबे यांनी केले तर आभार दादासाहेब दोडके यांनी मानले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामूहिक बुध्दावंदना घेण्यात आली.

यावेळी ऍड. किर्तीपाल सर्वगोड, सिकंदर ढवळे सर, आर. डी. पाराध्ये सर, आर. पी. कांबळे, गौतम सरतापे   माजी नगरसेवक रमेश कांबळे, कैलास ओहाळ यांचेसह  मान्यवर नेतेमंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close