Uncategorized

— आंबेडकरी त्रिसूत्रीची संकल्पना अंगी रुजवून भारतीय संविधाननिष्ठ समाज विकसित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी– डॉ मिलिंद आवाड :

सहावे सत्यशोधक साहित्यिक व सांस्कृतिक संमेलन संपन्न

सत्यशोधक मुक्त्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलनात बोलताना प्रा. डॉ. मिलिंद आवाड, व उद्धघाटक डॉ. वंदना सोनाळकर व इतर मान्यवर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जातमीमांसा तत्त्वज्ञान जातीग्रस्त आहेत. सत्याविना धर्म नाही, मानवाचा धर्म सत्यनिती होय म्हणत सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरतात. हीच या साहित्य संमेलनाची वैचारिक भूमिका असून, समता, स्वातंत्र्य, बंधुता या आंबेडकरी त्रिसूत्रीची संकल्पना अंगी रुजवून भारतीय संविधाननिष्ठ समाज विकसित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे   मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी व्यक्त केले.व त्यातून व्यक्त झालेले आत्मसन्मानासारखे नैसर्गिक हे दलित व स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा ठरेल. भारतासारख्या समाजव्यवस्थेत आत्मसन्मानासारखी नैसर्गिक गोष्ट व्यक्ती-व्यक्तीमध्ये रुजू दिली जात नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील समाजात जे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पातळीवरील घडलेले बदल काही अंशी असले तरी   ते अभासीय स्वरूपाचे आहेत. सत्याविना धर्म नाही, मानवाचा धर्म सत्यनिती होय म्हणत सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरतात. हीच या साहित्य संमेलनाची वैचारिक भूमिका असल्याचे डॉ. आव्हाड यांनी स्पष्ट केले.

अभिव्यक्तीच्या साचेबंद मर्यादा ओलांडून त्याची वाङ्गयीन मूल्य, सांस्कृतिक विचार व त्यातून अभिव्यक्त होणारा व्यवस्थेविरुद्धचा राग, चीड, विद्रोह, असंतोष, बंड करणे ही साहित्यबाह्य कृती जरी वाटत असेल तरी, ती भविष्यातील साहित्यिक सांस्कृतिक सत्ताकारणाचे संचित असते, असे मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी व्यक्त केले.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ६ व्या राज्यस्तरीय सत्यशोधक मुक्ता  साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन दिनांक 3 मार्च   रोजी संपन्न झाले.    यावेळी उद्धघाटक डॉ. वंदना सोनाळकर,  मुंबई,साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन बगाडे, भैरू  लोंढे,यशवंत फडतरे, लक्ष्मी यादव मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उ‌द्घाटन करण्यात आले. दरम्यान जात, वर्ग, स्त्रीदास्यचे प्रतीक असलेल्या पोस्टर उपस्थितांच्या हस्ते फाडण्यात आले.

अभिव्यक्तीच्या साचेबंद मर्यादा ओलांडून त्याची वाङ्गयीन मूल्य, सांस्कृतिक विचार व त्यातून अभिव्यक्त होणारा व्यवस्थेविरुद्धचा राग, चीड, विद्रोह, असंतोष, बंड करणे ही साहित्यबाह्य कृती जरी वाटत असेल तरी, ती भविष्यातील साहित्यिक सांस्कृतिक सत्ताकारणाचे संचित असते, असे मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी व्यक्त केले.

संमेलनाविषयीं भूमिका सचिन बगाडे यांनी मानली. तर प्रास्ताविक श्रीमंत जाधव यांनी मानले तर सूत्रसंचालन श्रीधर जाधव यांनी केले.

दुपारच्या  पहिल्या सत्रात “आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज सद्यस्थिती आणि पुढील दिशा” या विषयावर परीसंवाद  दत्ता गायकवाड (जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक )  यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रात , प्रा.डॉ. दशरथ रसाळ, . . मच्छिंद्र गवाले, श्रीकांत कसबे,संपादक जोशाबा टाईम्स  यांनी सहभाग घेतला.

दुसऱ्या सत्रात “बहुजनांचा सांस्कृतिक संघर्ष सद्यस्थिती व पुढील दिशा” या विषयावर  .प्रा.डॉ. वनिता चंदनशिवे, यांचे अध्यक्षतेखाली  परीसंवाद  संपन्न झाला. यामध्ये लक्ष्मी यादव, पुणे   अशोक आगावणे, (सोलापूर )रामकृष्ण माने (करमाळा),  निशा भोसले यांनी सहभाग घेतला. त्यानंतर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केले बद्दल बाळासाहेब भडकवाड (जीवन गौरव पुरस्कार)  राजू बाविस्कर (आत्मकथा काळ्या निळ्या रेषा)  भारत दाढेल (कथासंग्रह जीवन गौरव पुरस्कार) अकुंश सिदगीकर (कवितासग्रह),  देविदास सौदागर, . लालासाहेब जाधव यांचा तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय  कामगिरी केले बद्दल आनंद चंदनशिवे,  पुनमताई अजित बनसोडे , उत्तम सरवदे, . शबाना समिरअली मुलाणी, .  सोहम लोंढे,  युवराज पवार, . शाहीर नंदकुमार पाटोळे,पंढरपूर, .रामकृष्ण माने-करमाळा,  विमल काळे दिवगंत बबन जोगदंड (मरणोत्तर पुरस्कार) श्रीमती गोदावरी बबन जोगदंड, सतीश कसबे उस्मानाबाद आदिना पुरस्कार करून गौरविण्यात आले.

श्रीकांत कसबे,पंढरपूर,नेताजी वाघमारे सुस्ते, जयसिंग मस्के, खेड भाळवणी, हरी लोंढे, सोलापूर, जोतिबा पारखे अक्कलकोट, चंद्रप्रकाश  शिंदे बीड यांचा विशेष गौरव करण्यात आला.

शेवटच्या सत्रात कवी संमेलन पार पडले यामध्ये क वी शंकर कसबे, कवी दत्तु लोंढे कवी मारुती कटकधोंडे, लक्ष्मी यादव, भरत यादव व इतर कवीनी सहभाग घेतला.या कविसंमेलनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

 सुरुवातीस संविधानाची प्रत हाती घेऊन दुमदुमली रॅली संमेलनाच्या निमित्ताने संविधानाची प्रत हातात घेऊन संविधानाचा जयघोषकरत संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी जयघोषाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुमदुमून निघाला होता. रॅलीची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काढण्यात आली. 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close