Uncategorized
पंढरपूरात संत विचार पीठाकडून ‘समता वारी सोहळ्या’ चे आयोजन
दिनांक 8ते 10 मे तीन दिवस भर गच्च कार्यक्रम होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनीधी–
संतभूमी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या पंढरपूरात संत विचार पीठाकडून ‘समता वारी सोहळ्या‘ चे आयोजन केले असल्याची माहिती संत विचार पीठ यांच्या द्वारे दादासाहेब रोंगे, सारंग कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संताच्या विचारावर आधारित ‘संत विचार पीठ’ ही संस्था २०२४ साली स्थापन झाली असून या संत विचार पिठात अनेक संत साहित्य क्षेत्रातील अभ्यासू मंडळी, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक असा मोठा अभ्यासू वर्ग असून संघटनेतील पदाधिकारी व सदस्य संतांच्या विचारांचे प्रचार व प्रसार करीत असून याचे कार्य सर्वदूर पोचले आहे.
याच धर्तीवर येत्या बुधवार ते शुक्रवार तीन दिवस विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बुधवार ८ मे रोजी मंगळवेढा येथून श्रीसंत चोखोबाराय यांची पालखी नगरप्रदक्षिणा करणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार ९ मे रोजी सकाळी ७ ते ९ पंढरीतून प्रदक्षणा करत ‘ग्रंथ दिंडी‘ निघणार आहे. याचे उदघाटन श्रीसंत तनपुरे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते तर श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे उपाध्यक्ष भिमराव रोंगे, श्रमिक सहयोग, चिपळूणचे उपाध्यक्ष भार्गव पवार हे उपस्थित राहणार आहे.
त्यानंतर लोटस इंग्लिश स्कूल मध्ये मदर टेरेसा पुरस्कार विजेत्या, समाजसेविका, जेष्ठ विचारवत मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोटस इंग्लिश स्कूल मध्येच संतसाहित्य संमेलनाचे उदघाटन व परिसंवाद कार्यक्रम होणार असून यासाठी श्री, विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूरचे अध्यक्ष हणमत बागल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळ मधील जेष्ठ विचारवंत, लेखक व तत्वचिंतक डॉ अशोक राणा तर संतविचार पीठ, पंढरपूर चे अध्यक्ष ह.भ.प. भारत जाधव महाराज हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. दुपारी सुप्रसिद्ध भारुड गायिका सौ. चंदाताई तिवारी व त्यांच्या सहकार्याचे भारुड हा लोककला प्रकार सादर होणार आहे. यासाठी जेष्ठ पत्रकार व संपादक शिवाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
दुपारच्या भोजनानंतर ‘संतांची चळवळ या ‘धार्मिक व सामाजिक‘ या विषयावर पहिले परिसंवाद होणार आहे. अध्यस्थानी श्यामसुंदर सोन्नर महाराज (मुंबई )हें राहणार आहेत. यामध्ये शामसुंदर मिरजकर (मायणी )ज्ञानेश्वर बंडगर महाराज (सांगोला )सुहास फडतरे महाराज (कोरेगाव )यांची उपस्थिती राहणार आहे. तर सवांदक म्हणुन प्रा. डॉ. यशपाल खेडकर हें राहणार आहेत.
सायंकाळी 4ते 6′साने गुरुजी व संतविचार‘ या विषयावर दुसर्या परिसंवादाचे आयोजन केले आहे.यासाठी अध्यक्ष म्हणुन देवदत्त परुळेकर महाराज (वेंगुर्ला )हें असून प्रा. राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर )श्रीरंग गायकवाड (पुणे ) प्रा. स्वामीराज भिसे यांचा सहभाग आहे यासाठी संवादक म्हणुन शिवाजी शिंदे (पंढरपूर )हें आहेत.
सायंकाळी 7ते 9″पूज्य साने गुरुजी प्रेमी मंडळी “यांची
येथील श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये समन्वय व आढावा बैठक आयोजित केले असून यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
अखेरच्या दिवशी शुक्रवार 10मे रोजी सकाळी ७. वा. नामदेव पायरी समोर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, महाद्वार येथे ‘समतेचा जागर‘ भजन, गीत व घोषणा इ. श्री. संत चोखोबाराय यांचा श्री. पांडुरंग दर्शन सोहळा साजरा होणार आहे.
श्रीसंत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदीर येथे ह.भ.प. भारत जाधव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतविचार आणि अस्पृश्यता निवारण या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.यामध्ये डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर )नितीन सावंत महाराज (परभणी )अभय जगताप महाराज (पुणे )यांचा सहभाग असणार असून संवादक सारंग कोळी हें असणार आहेत.
सकाळी 10ते 12 यावेळेत डॉ. अशोक राणा (जेष्ठ विचारवंत )यांचे अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होत असून यासाठी दत्तात्रय कोंडलकर, सदाशिव मगदूम मिरज, वसंत एकबोटे नाशिक, यांचेसह संत विचारपीठाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



