आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पुतळा पंढरीत उभा करावा.. जय मल्हार क्रांती संघटनेच न पा ला निवेदन.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर दि…. इंग्रजी सत्ते विरोधात लढून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा पुतळा पंढरीत उभारण्यात यावा. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा व या आद्य क्रांतिवीराची आठवण कायम स्वरूपी जगाला रहावी.व उपेक्षित क्रांतिवीराला न्याय मिळावा या साठी जय मल्हार क्रांति संघटनेच्या वतीने पंढरपूरनगर पालिकेला निवेदन देण्यात आले उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर यांनी मुख्याधिकांर्यांच्या वतीने निवेदन स्विकारले.
या वेळी जय मल्हार क्रांति संघटनेचे जिल्हा संघटक महेंद्र बापू चव्हाण दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देवकुळे, शिवसेना (उबाठा) चे जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे.उमाजी जाधव महेश मदने. प्रशांत भुई.सचिन चव्हाण. मार्तंड मकार शनीभाऊ गुले. समाधान वायदंडे सोनू चव्हाण हरी चव्हाण विनायक भुई आदी उपस्थित होते..