फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थीनींचा सन्मान समारंभ संपन्न
माता रमाई यांचे १२६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता बॅरीस्टर पी.जी.पाटील सभागृह,कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थीनींचा सन्मान समारंभ सोहळा संपन्न झाला.
अभिजीत (आबा) पाटील चेअरमन, श्री विठ्ठल सह.सा. कारखाना लि. जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा अमरजीत पाटील सी.डी.सी.व जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा,डॉ. नाईकनवरे बी.एस. उपप्राचार्य, के. बी. कॉलेज, पंढरपूर बा. ना. धांडोरे सल्लागार फुले शाहू आंबेडकर विचारमंच, आर. पि. कांबळे सल्लागार फुले शाहू आंबेडकर विचारमंच, सचिव जितेंद्र बनसोडे यांचे हस्ते विध्यार्थ्यांचा शाल, बुके व भारतीय संविधान देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुनिल वाघमारे अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, हें होते.
गुणवंत विद्यार्थी—रोहित मोहन देडगे-गटविकास अधिकारी
,डॉ. प्राजक्ता पोपट क्षीरसागर-M D ,
श्रद्धा दयानंद मस्के-NET,
डॉ.सोनल सुनिल रणदिवे–MBBS,
वृषाली नामदेव सरवदे-पशु वैद्यकीय अधिकारी,
चैताली नामदेव सरवदे –mastar of law ,
पियुष भगवानराव भोसले– तलाठी ,
डॉ. प्रज्ञा दत्तायय पाटोळे– BAMS ,
डॉ.प्रतिक्षा वायदंडे–BEMS,
प्रांजल पाटोळे–राज्यस्तरीय धनुर्विद्या गोल्डमेडल
,शेजल चव्हाण– धनुर्विद्या राष्ट्रीय स्तरावर निवड ,कृतिका चंदनशिवे आदींचा गौरव करण्यात आला.
विशेष सन्मान – कुमारी श्रुती लक्ष्मण कांबळे इयत्ता ७ वी तुकडी क,कवठेकर प्रशाला नाथ चौक, पंढरपूर हिस विविध स्पर्धेतील मराठी निबंध लेखन-प्रथम, मराठी कथाकथन-प्रथम,मराठी पद्य पाठांतर – प्रथम, हिंदी निबंध लेखन-प्रथम,हिंदी पद्य पाठांतर-प्रथम, इंग्रजी पद्य पाठांतर-प्रथम, इंग्रजी कथाकथन-प्रथम, लिंबू चमचा-प्रथम,स्व.रघुनाथ वामन पटवर्धन पारितोषिक–सर्वप्रथम विद्यार्थीनी,स्व.सुमन सदाशिव गोंदकर पारितोषिक-अष्टपैलू व्यक्तिमत्व या प्रविण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस माता रमाई चे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दत्तात्रय पाटोळे सर यांनी सामूहिक संविधान उद्दीशकेचे वाचन करण्यात आले.
प्रास्ताविक माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीकांत कसबे यांनी दिला. सूत्रसंचालन दादासाहेब दोडके सर यांनी केले. तर आभार ऍड. किशोर खिलारे मानले.
चंद्रकांत सातपुते सर, देविदास कसबे, जैनुद्दीन मुलाणी, प्रा. शिवाजी वाघमारे सर, पोपट क्षीरसागर, सुनील रणदिवे सर, समाधान वायदंडे देगांव यांचेसह विध्यार्थी विदयार्थीनी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.