्प्रा.डॉ. वामन निंबाजी साळवे यांना संत नामदेव साहित्य पुरस्कार प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
ईचलकरंजी :-इचलकरंजी येथील प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवेयांना नानक -साई फाऊंडेशन नांदेड या संस्थेचे वतीने आयोजित केलेल्या संत नामदेव साहित्य संमेलनात संत नामदेव साहित्य पुरस्कार प्रा.फ.मु.शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई व नानक -साई फाऊंडेशन नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने . ४फेब्रुवारी, २०२४ रोजी श्री ग्रंथ साहीब भवन, एसी हॉल नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात साहित्यक,पत्रकार,व इतर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ.जगदिश कदम, संस्थेंचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,.घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन देवकर, महाराष्ट्र राज्य संस्कृती व साहित्य मंडळाचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. .साळवे शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आहेत व इचलकरंजी येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे सेवा निवृत्त प्राध्यापक आहेत.


