सोलापूर लोकसभा काॅंग्रेसने जागा ॲड.प्रकाश आंबेडकरांना सोडावी. :- अमरजित पाटील.
काॅंग्रेसला सहकार्य नाही कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील गटाची भूमिका .

जोशबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सोलापूर लोकसभा मतदार काॅंग्रेस उमेदवाराला कर्मवीर आण्णा गट सहकार्य करणार नाही.असे कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील गटाचे नेते अमरजित पाटील यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे जाहीर केलेले आहे.
काॅंग्रेस सदर लोकसभा मतदार संघात काॅंग्रेस पक्ष अत्यंत कमकुवत स्थितीमध्ये असून या मतदार संघात काॅंग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही विजयी होऊ शकत नाही.त्याऐवजी सोलापूर लोकसभेची जागा काॅंग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीला सोडून त्या जागेवरुन ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक लढवावी.भाजपाच्या संभाव्य उमेदवाराचा पराभव फक्त ॲड.प्रकाश आंबेडकर हेच करु शकतात.सोलापूर लोकसभा मतदार संघातील मागील निवडणुकीचा अनुभव पाहता आणि सध्याचे सामाजिक – राजकीय वातावरण पाहता ॲड.प्रकाश आंबेडकरांनीच सदर मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढवावी.महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यास सदर जागा ॲड.प्रकाश आंबेडकरांनी लढवावी.आम्ही कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील गटाच्या वतीने त्यांना संपुर्ण सहकार्य करु.परंतु,कोणत्याही सबबीवर काॅंग्रेस उमेदवाराला सहकार्य केले जाणार नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लोकसभा मतसंघात समाविष्ट असणार्या पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर आण्णा गटाच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांपर्यंत योग्य वेळी आम्ही आमची भुमिका पोहचवत आहोत.असे ही अमरजित पाटील यांनी यावेळी पत्रकात म्हटलेले आहे.



