डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ” रक्तदान शिबीर”
भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ व रमामाता महिला मंडळ व उमेश सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ व रमामाता महिला मंडळ व मा.उमेश सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवाण दिनानिमित्त ” रक्तदान शिबीर ” चे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास आभिवादन केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक डि.राज सर्वगोड, रिपाई अ चे तालुकाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, ऍड.किशोर खिलारे, कामगार नेते गुरु दोडिया.ओंकार वाळुजकर,.शैलेश आगावणे, सुकदेव माने,.भगवान सर्वगोड, राम खरात, राम सर्वगोड, सिध्दार्थ माने, .आप्पा गावकरे,
श्रीकांत शिंदे व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते


