Uncategorized
आवताडे शुगरनेही केली ऊस दरात वाढ, पहिला हप्ता २७११ रुपये देणार– चेअरमन संजय आवताडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मंगळवेढा/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऊस दाराची स्पर्धा लागली असून पंढरपूर नंतर मंगळवेढा तालुका ही मागे राहिला नाही अवताडे शुगरने या अगोदर ऊस दराचा पहिला हप्ता २५५१ रुपये जाहीर केला होता मात्र इतर कारखान्यानी जादा दर जाहीर केल्याने यामध्ये अवताडे शुगरने ही मागे न राहता २७११ रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे
यावेळी आवताडे म्हणाले कि आवताडे शुगर सर्वाधिक दर देणार असा विश्वास आमच्या परस्पर शेतकऱ्यांना सुद्धा आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभारला असून आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे उसाची रिकव्हरी अजून चांगली वाढली तर अजून चांगला दर देण्यात येईल असे यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी बोलून दाखविले.
आवताडे शुगर ने गेल्या वर्षी पहिल्या गळीत हंगामामध्ये एकरकमी २३५० रुपये ऊस दर दिला होता यंदा आवताडे शुगर चा दुसरा गळीत हंगाम असून २७११ रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.
