Uncategorized

गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन…!! महर्षी वाल्मिकी संघ, युवा सेनासह राष्ट्रवादी आक्रमक…!

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील अर्बन बँक, मौलाना आझाद चौक, जुनी पेठ पोलीस चौकी, जुनी पेठ तालीम चौक, बैलगोटा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकअंबाबाई पटागंण या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे यासाठी रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अर्बन बँक ते मौलाना आझाद चौक या मध्यवर्ती ठिकाणी लोकमान्य विद्यालय आहे. या विद्यालयात असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या रस्त्यावरून ये जा करतात पण त्या रस्त्यावर गतिरोधक नाही. या रस्त्यावरून प्रचंड अशी मोठी वाहतूक आहे. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक या रस्त्यावरून चालते. त्याकडे बघण्यासाठी प्रशासनाकडे लक्ष नाही तिथं वारंवार अपघात घडतात या अपघातामध्ये कित्येक वयोवृद्ध लोकांना लहान मुलांना वाहनांची ठोसर बसली आहे.

त्यामुळे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रशीद शेख यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर झोपून प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी महर्षी वाल्मिकी संघ युवक अध्यक्ष सुरज अभंगराव, युवा सैनिक विशाल डोंगरे, रवी अधटराव, पोपट परचंडे, अभय अंकुशराव, वाल्मिकी अंकुशराव आदी उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close