डीपीआय पंढरपूर शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-डेमोक्रोटीक पार्टी ऑफ इंडिया ( डीपीआय)पंढरपूर पंढरपूर शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्याची बैठक योगा भवन येथे रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बैठकीचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते अर्जुन खिलारे हे होते. तर मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे, कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष ऍड. किशोर खिलारे यांनी केले. फुले शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ यांचे विचारावर संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे,प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, युवक प्रदेशाध्यक्ष सोहम लोंढे यांचे नेतृत्वाखाली संघटना वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवहन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष अमित अवघडे व तालुकाध्यक्ष सुधाकर मस्के यांनी नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या.
ङी. पी.आय.तालुका कार्यकारिणी तालुका कार्याध्यक्ष दाजी खिल्लारे(ग्रामपंचायत कासेगाव)तालुका संघटक दत्तात्रय लोखंडे(ग्रामपंचायत सुस्ते) शहर संघटक आरिफ भाई बागवान प्रसिद्धीप्रमुख विकी साठे खजिनदार रवींद्र शिंदे सहखजिनदार स्वप्निल वाघमारे,शहर सहसचिव रोहित जाधव
या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडीचे पत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. जयसिंग खिलारे, अमोल खिलारे, लक्ष्मण रणदिवे,,संपादक श्रीकांत कसबे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहर कार्याध्यक्ष शंकर वाघमारे यांनी केले तर आभार बाबासाहेब खिलारे यांनी मानले. यावेळी शहर उपाध्यक्ष विशाल तुपसौदर, तालुका उपाध्यक्ष संजय लोखंडे अजय तुपसौदर, शिवाजी लोखंडे,अनिल कांबळे, धनंजय खिलारे, विशाल वाघमारे, महादेव वाघमारे कासेगाव, दत्ता लोखंडे भाळवणी ग्रामपंचायत सदस्य, संजय कसबे खरसोळे, जीवन कांबळे पंढरपूरआदी उपस्थित होते.