Uncategorized

आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनेतील कार्यकर्त्याची बैठक संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविणे या साठी पंचशील मंडळाने बैठकीचे आयोजन डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे केले होते.या बैठकीचे अध्यक्षस्थानी पंचशील मंडळाचे अध्यक्ष आर. पी. कांबळे हे होते.यास उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी राज्य व केंद्र सरकारने संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरु केले असून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्या धोक्यात आणल्या असल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी आपापले कार्य करत असतानाच एकत्र येऊन शासनाचे  घटनाबाह्य मनसुबे उधळून लावणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा साठी आंबेडकरी आंदोलनकडे दुर्लक्ष होतं आहे याबाबींकडे गांभीर्याने बघितले पाहिजे यावर उहापोह झाला.

व्यक्तिगत हेवे दावे बाजूला ठेवून चळवळ म्हणुन सर्वांनी एकत्र आले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले

यावेळी सुभाष ढवळे सर(माजी मुख्याध्यापक गौतम विद्यालय,,) रिपाई चे राज्य संघटक सुनील सर्वगोड,प्रबुद्ध परिवाराचे सुनील वाघमारे, जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे,जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, बामसेफ चे एल. एस. सोनकांबळे,बसपा चे जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे, बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष ऍड. किशोर खिलारे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे कृष्णा वाघमारे,गुरु रविदास संघटनेचे नितीन बनपूरकर, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड, सुधीर मागाडे सर, सिद्धार्थ जाधव,दत्तात्रय पाटोळे सर, बी. आर. भोसले, वैभव माने, समाधान लोखंडे, अनिल जाधव सर,अनिल ननवरे सर,पत्रकार अभिराज उबाळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष संतोष पवार,रिपाईचे शहराध्यक्ष ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, माजी शहराध्यक्ष संजय सावंत,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे शहराध्यक्ष महेश साठे, कामगार नेते धनाजी वाघमारे,दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कांबळे, महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव,विश्वभूषण डाँ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी. राज सर्वगोड,भीमशक्ती सांस्कृतिक मंडळाचे उमेश सर्वगोड,जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर,पत्रकार रामचंद्र सरवदे, पत्रकार सचिन कांबळे, जेष्ठ साहित्यिक प्रा.शिवाजीराव वाघमारे,गौतम सरतापे,बसपाचे सुरेश शिंदे, रवी सर्वगोड,जे. के. गायकवाड, प्रवीण माने, नंदकुमार वाघमारे सर, सिकंदर ढवळे सर,पंचशील मंडळाचे मुकुंद मागाडे, पोपट क्षीरसागर, मारुती ठोकळे, राहुल चंदनशिवे,विनायक मागाडे ऋषिकेश भालेराव, ऍड. गौतम भालेराव यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढील नियोजन होईपर्यंत पाच जणांची अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये सुभाष ढवळे सर, एल. एस. सोनकांबळे, आर. पी. कांबळे, बा. ना. धांडोरे, श्रीकांत कसबे यांचा समावेश आहे.
प्रास्ताविक व आभार पंचशील मंडळाचे सचिव जितेंद्र बनसोडे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close