प्रा. डॉ. धनंजय साठे यांना राज्यस्तरीय “सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार” प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य, विचार व संशोधन परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामजिक कार्याबद्दल सद्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे कार्यरत असणारे इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय साठे यांना ” राज्यस्तरीय सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार” बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक व परिषदेचे अध्यक्ष प्रा. अमोल महापुरे यांच्या हस्ते व कोल्हापूर येथील पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, मच्छिंद्र कांबळे, प्रशांत अवघडे, रामचंद्र कांबळे व प्रकाश सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधान करण्यात आला.
प्रा. साठे हे गेली २० वर्षापासून समाजकारण, शिक्षण व राजकारणामध्ये सक्रिय सहभागी असून त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे करून बहुजन समाजातील वंचित पिढीत घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे व तरुण पिढी व्यसनमुक्त, अंधश्रद्धामुक्त व उच्च शिक्षित झाली पाहिजे याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार कोल्हापुर यथे प्रदान करण्यात आला. यावेळी उघडेवाडी गावच्या उपसरपंच सौ. सिमाली धनंजय साठे, सुहास जाधव व श्वेता जाधव यांच्यासह चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


