Uncategorized

युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी संदिप शिंदे तालुकाध्यक्षपदी मिलिंद भोसले यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

:-श्रीकांत कसबे

पंढरपूर-
युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी संदिप शिंदे, तालुुकाध्यक्षपदी मिलिंद भोसले, जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली असून सदरच्या नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा सोलापूर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनंजयदादा पवार यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रभारी प्रविण जाधव, पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, कॉंग्रेस सेवादलचे पंढरपूर शहराध्यक्ष गणेश माने, युवक कॉंग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ आरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close