Uncategorized

डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटलमध्ये ‘वंध्यत्व निवारण शिबिर’ संपन्न

महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत.' -- प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

:-श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘पंढरपूर व पंचक्रोशीत महिला रुग्णांच्या सेवेसाठी मागील दोन वर्षांपासून ‘डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटल’ च्या माध्यमातून आरोग्यासंबंधी विशेष सेवा बजावत असताना ‘महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांनी केले.
पंढरपूर व पंचक्रोशीत आपल्या रुग्णसेवेने अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ.स्नेहा रोंगे या मोफत ‘वंध्यत्व निवारण शिबिराच्या’ प्रसंगी बोलत होत्या. डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटलमध्ये नुकतेच ‘मोफत वंध्यत्व निवारण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ग्रामीण भागातील अनुभव घेत असतानाच शहरी भागातील रुग्णांना सेवा देण्याच्या हेतूने डॉ.स्नेहा रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार पंढरपूर शहरात ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’ सुरु केले असून ‘आपलं आरोग्य व आपला विश्वास’ या धर्तीवर सेवा देण्यासाठी हा दवाखाना रुग्णसेवेसाठी मागील दोन वर्षांपासून सज्ज आहे. डॉ. स्नेहा रोंगे ह्या स्वतः एमबीबीएस, एमएस (ओबीजीवाय) असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले आहे. या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी एक्सपर्ट व इन्फर्टीलिटी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉ.स्नेहा रोंगे यांची सेवा उपलब्ध आहे. या ‘मोफत वंध्यत्व निवारण शिबिरा’मध्ये सोलापूरातील ‘अपोलो फर्टिलिटी’च्या डॉ.मीनल चिडगुपकर यांनी महिला रुग्णांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या व यावरील उपचारांबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. या वंध्यत्व निवारण शिबिराच्या माध्यमातून महिलांनी घ्यावयाची काळजी व वयानुसार कशा प्रकारचे उपचार करावे? याबद्दलही त्यांनी मोफत सल्ला व मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांची रक्त तपासणी व इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात लग्न होवून एक वर्षापेक्षा जास्त काळ होवूनही अद्याप गर्भधारणा न झालेली जोडपी, वय ३० वर्षे व त्याहून अधिक असलेले पण गर्भधारणा झालेली नसेल, अनियमित मासिक पाळी असलेल्या महिला रुग्ण, पाळी येत नसलेल्या किंवा जास्त रक्तस्त्राव होत असलेल्या स्त्रिया, नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास सक्षम नसलेल्या स्त्रिया, एक किंवा त्यापेक्षा जास्त गर्भपात झालेल्या किंवा प्रेग्नन्सी लॉस झालेल्या अशा महिला रुग्णांनी सहभागी होवून स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे व डॉ.मीनल चिडगुपकर या तज्ञांकडून समस्या व उपचार यासंबंधी माहिती जाणून घेतली. दुपारपर्यंत जवळपास ५० जोडप्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ.चिडगुपकर म्हणाल्या की, ‘अनेक महिला रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांनी ग्रस्त असतात. अशा महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला आहे परंतु आणखी काही महिला रुग्ण अशा समस्येमुळे ग्रस्त असतील तर त्यांनी येत्या सात दिवसात रजिस्टर करावे. त्यांच्यावर मोफत सल्ला, उपचार व मार्गदर्शन केले जाईल.’ असे आवाहन देखील केले. ‘वंध्यत्व निवारण शिबिर’ यशस्वी करण्यासाठी मखनुर, शहापुरे, भाग्यश्री सोनकंटले, सचिन ढोपे, अबू कलाम अन्सारी, तसेच डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटलचे व ‘अपोलो फर्टिलिटी’ चे कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close