Uncategorized

विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब सोमदळे यांची जन्मशताब्दी निमित्त सर्व विभागातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां साठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये रक्तदाब, डायबिटीस, इतर आजारांची तपासणी करण्यात आली व कोणती घ्यावयाची याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. दादासाहेब सोमदळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिबिरासाठी उपस्थित असणारे डॉ. धनंजय देशपांडे, डॉ.चंद्रकांत लवटे,डॉ.सचिन थिटे ,डॉ.अमोल सातपुते, डॉ.स्वप्निल बाड, डॉ. व्हनमाने, डॉ. सचिन थिटे सर्व डॉक्टरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर इतर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेच्या आजीव सभासद सौ. सुनिताताई मोरे उपस्थित होत्या.आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर म्हणाले की सध्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळामध्ये डायबिटीस आणि हायपर टेन्शन हे आजार सायलेंटकिलर या नावाने ओळखले जातात त्यामुळे सहसा याची लक्षणे जाणवत नाहीत त्यामुळे सर्वांनी दर तीन महिन्याला तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी सकस वेळेवर आहार, दैनंदिन व्यायाम, दिलेल्या वेळेप्रमाणे औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे असेही प्रतिपादन केले.
आरोग्य शिबिरास सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये,पर्यवेक्षक सुनील पाटील,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते , मुख्य लिपिक हनुमंत मोरे सौ आशाताई जमदाडे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख श्री मुंढे यू. आर. यांनी केले सूत्रसंचालन श्री भोसले एम. ए. यांनी केले, आभार विभाग प्रमुख संजय पवार यांनी मानले.


.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close