दादासाहेब सोमदळे यांची जन्मशताब्दी विविध कार्यक्रमांनी साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर येथील श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.सदाशिव शिवराम सोमदळे अर्थात दादासाहेब सोमदळे यांच्या जन्मशताब्दीचा समारंभ विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड वैभव टोमके हे होते त्यांनी दादांच्या अनेक आठवणी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब शिंगाडे हे होते त्यांनी दादांच्या सहवासातील अनुभव व त्यांनी केलेले शैक्षणिक कार्याची सविस्तर माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. या जन्मशताब्दी निमित्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला,निबंध,भाषण, बुद्धिबळ,अशा विविध विविध स्पर्धा, ज्युनियर कॉलेज येथे वृक्षारोपण, त्याच बरोबर स्वच्छता मोहीम इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिस्टान्न जेवण देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांनी केले.या यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, खजिनदार,सलीम वडगावकर,ज्येष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सुनील पाटील,विभाग प्रमुख संजय पवार,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, सुनिता मोरे, अधीक्षक अमोल हुंगे, विलास पवार, आशा जमदाडे,दत्त विद्या मंदिरचे सुस्तेचे मुख्याध्यापक अशोक बनसोडे , प्राथमिकच्या मुख्याध्यापिकाअंजली अटकळे तसेच सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजुभाई मुलाणी व मोहिनी जरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख शिवाजी येडवे यांनी मानले कार्यक्रमाच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला.