Uncategorized

चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरी मुळे पडलेल्या खड्ड्यात मेणबत्ती लावून प्रशासनाचा निषेध…..

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन!

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी):-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पात्रामध्ये गेलेला आहे आम्ही वारंवार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतो पण झोपलेले शासन अद्याप पर्यंत जाग होत नाही त्यामुळे आम्ही आज महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेच्या पत्रामध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवसा प्रशासन झोपले असल्यामुळे रात्री मेणबत्ती लावून वाळूच्या पडलेल्या खड्ड्यामध्ये शासनाचा निषेध केला. अनोखे आंदोलन केली ह्या मेणबत्त्याकडे बघत बघत तरी चंद्रभागेच्या पात्रामध्ये पडलेल्या खड्ड्यांकडे शासनाने बघावं अशी मागणी आम्ही ह्या माध्यमातून करत आहोत.

माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सध्या अधिवेशन चालू आहे आमची महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने मागणी आहे कि कित्येक गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वारंवार वाळू चोरी संदर्भात आवाज उठवतोय पण अद्याप पर्यंत चंद्रभागेतली वाळू चोरी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांना अपयश आलेला आहे त्यामुळे इथले प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित सर्व अधिकार्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांची बदली करावी अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली. कारण हे अधिकारी ह्या पंढरपूर तालुक्यांमध्ये राहिले तर चंद्रभागा बकाल झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागणीचा शासनाने गंभीर विचार करावा अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल. यावेळी गणेश अंकुशराव, सुरज कांबळे, गणेश तारापूरकर, सोमनाथ अभंगराव, सचिन नेहतराव, साहिल माने, आप्पा करकमकर, श्रावण कोताळकर, रामभाऊ कोळी, शिवप्रसाद परचंडे, उमेश तारापूरकर, सोमेश अधटराव, पिंटू करकमकर, राजू अभंगराव.इत्यादि उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close