साहित्याची उंची जरी काल्पनिक असली तरी त्याची वास्तवता जीवनात असते –.प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांना “काटेरी गुलाब” हे पुस्तक देऊन सत्कार करताना ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. निवांत कवळे व शंकर अंबवडे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- कवी मन हे क्षणात आकाशात तर क्षणात सातासमुद्रापलीकडे जरी जात असले आणी साहित्याची उंची जरी काल्पनिक असली तरी त्याचा सारांश हा जीवनाच्या वास्तवाशी निगडित असतो असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी आज इस्लामपूर येथे केले.ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. निवांत कवळे यांनी लिहिलेले” काटेरी गुलाब “हे तीन आवृत्ती निघालेलं पुस्तक भेट देऊन सत्कार केला .त्यावेळी प्रा. सुभाष वायदंडे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रा.कवाळे यांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून समाजकार्य करण्याची संधी मिळावी अशी आशा व्यक्त केली.यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे चित्रपट सेनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर आंबवडे, वाळवा तालुकाध्यक्ष सरपंच शिवाजी सकटे, पश्चिम महाराष्ट्र युवकचे उपाध्यक्ष अमर शिंदे,युवती जिल्हाध्यक्षा वनिता सोनवले,दिपक शिंदे,कुमार पाटसुते,युवराज वाघमारे,मधुकर सकटे,निशांत कवळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



