Uncategorized

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे उपजिल्हा रुग्णालय म्हणजेच सामान्य रुग्णालय तीन तास अंधारात

अन्यथा तीव्र आंदोलन करणार --गणेश अंकुशराव

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर :-आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे उपजिल्हा रुग्णालय म्हणजेच सामान्य रुग्णालय.
पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल मध्ये लाईट तीन तास गायब होती पूर्ण शहराची लाईट गेली होती. पण उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक लहान बाळ, वृद्ध, गर्भवती महिला, व नागरिक व अनेक पेशंट ऍडमिट होते. शासनाला तिथं जनरेटर व इन्व्हर्टर ची सोय करणं गरजेचं होतं.

पंढरपूर हे महाराष्ट्रातील अध्यात्मिक शहर आहे. लाखो भाविक येत जात असतात. व पंढरपूर तालुक्यातुन खेड्या पड्यातून व जिल्ह्यातील अनेक पेशंट इथं उपचारासाठी येत असतात. पण तिथं पूर्ण पणे गैरसोय होत आहे. तिथे जनरेटर व इन्व्हर्टर नाही. सगळा कारभार रामभरोसे आहे.

लाईट नसल्यामुळे अनेक पेशंटला त्रास सहन करावा लागला लहान बाळं आय सी यु मधून बाहेर आणली गेली वयोवृद्ध नागरी पोर्च मध्ये येऊन बसले अशावेळी एखादी घटना घडली असती. किंवा एखाद्या बाळाच्या जीवाला काय झालं असतं. तर याला जबाबदार कोण तसंच कॉटेजमध्ये पूर्ण पणे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सगळ्या यंत्रणा असूनही नागरिकांची गैरसोय होत आहे.

शासन नुसतच आरोग्याच्या योजना दिल्या म्हणून मोठ मोठ्या जाहिराती करतो पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काही नाही. उपजिल्हा रुग्णालयामध्ये लवकरात लवकर इन्व्हर्टरची जनरेटर ची सोय करावी तिथली गैरसोय टाळावी स्वच्छता ठेवावी व तिथे रिक्त पद भरावी,

अशी मागणी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करतोय येणाऱ्या काळामध्ये ह्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असे गणेश अंकुशराव यांनी इशारा दिला आहे. यावेळी संपत सर्जे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close