पुरोगामी संघर्ष परिषदेचा पन्हाळा तहसीलवर भव्य मोर्चा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पन्हाळा:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने शिंदेवाडी तालुका पन्हाळा या गावातील पायाभूत सुविधांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली पन्हाळा तहसीलवर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
बाजीप्रभू देशपांडे यांचे पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून अव्वल कारकून यानी निवेदन स्वीकारले. सदर निवेदनामध्ये 28 वर्षापासून गावाला साडेचार किलोमीटरचा रस्ता अद्याप केलेला नाही तो ताबडतोब करावा गावात वैद्यकीय सोयी उपलब्ध व्हाव्यात वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा गावाला गटग्रामपंचायत मिळावी व माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी पाणी जेवढे दिवस दिले जाते तेवढीच पाणीपट्टी आकारली जावी इत्यादी मागण्या करण्यात आले आहेत.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पन्हाळा तालुकाध्यक्ष सौ सुनंदा शिंदे यांच्या हस्ते सदर निवेदन देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ पूजा बागडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसा भाई मुल्ला इत्यादी उपस्थित होते.
मोर्चाला मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे म्हणाले तहसील कार्यालयावर मोर्चा येत असताना तहसीलदार यांनी या ठिकाणी हजर नसणे शिवाय नायब तहसीलदार सुद्धा नसणे ही बाब नागरिकांच्या हक्काच्या दृष्टिकोनातून खूप गंभीर असून प्रा. सुभाष वायदंडे यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. सदर मोर्चा पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख लखन वायदंडे ,महाराष्ट्र युवकचे कार्याध्यक्ष गणेश वाईकर , मेजर अंकुश भाऊ शिंदे ,सांगली जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे ,अक्षय खुडे, श्रीमंत कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष आधिक चव्हाण, सुकेशनी साठे, वनिता सोनावळे, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष दिलीप कांबळे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा सौ. भारती पोवार इत्यादी पदाधिकारी व शिंदेवाडी गावचे ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.



