पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वाळवा तालुका उपाध्यक्षपदी गौतम कांबळे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वाळवा तालुका उपाध्यक्षपदी मेजर गौतम कांबळे यांना नियुक्तीचे पत्र देताना सांगली जिल्हाध्यक्षा सौ. वनिता सोनावळे, लीला संकपाळ व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- पुरोगामी संघर्ष परिषदेची वाळवा तालुका कार्यकारिणीची बैठक इस्लामपूर येथील शासकीय विश्रामग्रहामध्ये पार पडली. सदर बैठकीमध्ये वाळवा तालुका उपाध्यक्षपदी मेजर गौतम कांबळे यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली जिल्हाध्यक्षा( युवती ) सौ. वनिता सोनावळे यांच्या हस्ते देण्यात आले.
निवडीनंतर बोलताना सौ.वनिता सोनावळे म्हणाल्या सामाजिक काम करत असताना समाजाप्रती आपण देणे लागतो याचं भान ठेवून काम केल्यास सामाजिक परिवर्तन होण्यास मदत होईल.
यावेळी वाळवा तालुका अध्यक्षा लीला संकपाळ ,इस्लामपूर शहर अध्यक्षा शैनाज जमादार, सुशीला ठोंबरे ,संदीप माने ,मुबारक मिस्त्री ,अमोल गाडे ,सचिन हेले ,रमेश कांबळे, विजय लखे, सरिता नांगरे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.