Uncategorized
जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्यांना निवेदन देत केली मागणी…
पंढरीतील बंद उद्यानं सुरु करण्यासाठी सरसावले युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर


-श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी):- गेल्या अनेक वर्षांपासुन पंढरपूर शहरातील जिजामाता उदद्दयान व पद्मावती उद्यान ही दोन्ही उद्यानं बंद असल्याने पंढरीतील लहान मुलांना खेळण्यासाठी एकही ठिकाण नाही. कोरोना काळात घरात बसुन कंटाळलेल्या लहान मुलांना खेळण्यासाठी व वयोवृध्द मंडळींना बाहेर मोकळा श्वास घेण्यासाठी आत्ता तरी पंढरीतील ही दोन्हीही उद्याने लवकरात लवकर खुली करावीत यासाठी आत्ता पंढरीतील युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर हे सरसावले असुन आज त्यांनी पंढरीतील अनेक बालकांना सोबत घेऊन पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकार्यांचे दालन गाठले आणि या बालकांच्या हस्ते निवेदन देत बंद असलेली ही दोन्ही उद्यानं लवकरात लवकर खुली करावीत, अशी मागणी केली.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.