Uncategorized

आटपाडीचे गोरखनाना पाटील यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

आटपाडी दि . १२ ( प्रतिनिधी )
आटपाडी येथील सुस्वभावी, प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व, दि . सांगली अॅनर्स सोसायटीचे माजी संचालक व  पाटबंधारे पतसंस्था सांगलीचे माजी व्हाईस चेअरमन गोरखनाना नामदेव पाटील यांचे हृदयविकाराने आज अकस्मीत निधन झाले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांचे कनिष्ट बंधू आणि  जि . प . प्राथमिक शाळा नं. २ शेटफळेच्या मुख्याधिपीका सुवर्णाताई पाटील यांचे गोरखनाना पाटील हे पती होते . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील हे गोरखनाना यांचे पुतणे होत . ६४ वर्षाच्या गोरखनाना पाटील यांना पत्नी, सुहास आणि सुजित हे दोन उच्च शिक्षित मुले, एम . बी .बी .एस . डॉक्टर कन्या प्रणाली , भाऊ, भावजयी, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे अन्य नातलग असा मोठा परिवार आहे . सहाच दिवसापूर्वी दि . ७ फेबुवारी रोजी त्यांच्या डॉक्टर कन्या प्रणाली यांचा विवाह शेकडो मान्यवर महोदयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात आटपाडी येथील जवळे हॉल येथे संपन्न झाला होता . गोरखनानांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे . गोंदिरा, आंबेबनमळा, यप्पावाडी, खानजोडवाडी येथे भावकी आणि तडवळे ही सासरवाडी असलेल्या गोरखनाना पाटील यांचा सर्व क्षेत्रात मोठा मित्र परिवार आहे . आयुष्यभर अतिशय निष्टेने, कष्टाने पाटबंधारे विभागात सेवा बजावलेल्या गोरखनानांना हजारो शेतकऱ्यांत सच्चे मित्र म्हणून ओळखले जात असे . शांत, संयमी, मृदुभाषी तथा मिश्कील स्वभावाच्या गोरखनाना पाटील यांना अजातशत्रु , नेक व्यक्तीमत्व म्हणून सर्वदूर परिचित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close