गौतम विद्यालयाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ 17फेब्रुवारीला होणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-डाँ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित पीपल्स एज्युकेशनचे संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वसतिगृह व गौतम विद्यालय यांचे संयुक्त विध्यमाने स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ 17फेब्रुवारीला गौतम विद्यालय पटांगण येथे होणार आहे.
दुपारी 4:30वाजता पारितोषिक वितरण संस्थेचे माजी विद्यार्थी व माजी प्राचार्य डी. बी. शिंदे यांचे हस्ते होणार असून सुनील सर्वगोड (कार्यकारी सदस्य पी. इ.एस मुंबई ) यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून अध्यक्षस्थान मुख्याध्यापक एन. एम. वाघमारे भूषविणार आहेत.
सायंकाळी 7 वाजता “सांस्कृतिक कार्यक्रम” संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आग्रहाचे निमंत्रण मुख्याध्यापक एन. एम. वाघमारे सर, शिक्षक प्रतिनिधी डी. टी. सावंत सर, विध्यार्थी प्रतिनिधी विशाल डोलारे,विध्यार्थीनी प्रतिनिधी रोहिणी होवाळ, राहुल ढवळे अध्यक्ष शालेय विकास व व्यवस्थापन समिती, सौ. उमा बाबासाहेब लोंढे अध्यक्षा शिक्षक पालक संघ व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी,विध्यार्थीनी यांनी केले आहे.