पुरोगामी संघर्ष परिषद सांगली वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी मल्हारी चव्हाण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी मल्हारी चव्हाण यांना निवडीचे पत्र देताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे,राजू दादा घाटगे,सुनिता खटावकर, वनिता सोनवले,शिला बनसोडे,नयना लोंढे,साबेरा इंगळे व इतर
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी मल्हारी चव्हाण
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
बामणोली:- (कुपवाड) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी बामनोली येथील मल्हारी जगन्नाथ चव्हाण ( रा.बामणोली )यांची मिरज संजयनगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी निवड जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.
यावेळी प्रा. सुभाष वायदंडे यांनी सामाजिक चळवळींना आलेली मरगळ झटकून टाकून नव्याने जिल्ह्यातील समाजाच्या तळागाळात जाऊन अन्यायाच्या विरोधात लढण्याचा सल्ला दिला. निवडीनंतर बोलताना मल्हारी चव्हाण म्हणाले पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात समाजातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे,राज्य उपाध्यक्षा सुनीता खटावकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कुमारी नयना लोंढे, वरिष्ठ जिल्हाध्यक्षा वनिता सोनावले, कोल्हापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्षा साबेरा इंगळे, शहर जिल्हा अध्यक्षा शिला बनसोडे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, मिरज तालुका अध्यक्ष अनिल देवकुळे, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश वाघमारे, प्रवीण भंडारे, मिरज शहर अध्यक्षा मेहेक निशानदार, इस्लामपूर शहर अध्यक्षा शहनाज जमादार इत्यादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


