संविधानाची उद्देशिका वाचून अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे शुद्धीकरण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिरज येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे संविधानाची उद्देशिका वाचून शुद्धीकरण करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे राजू दादा घाटगे सुनिता खटावकर व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
*मिरज:-* पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सांगली येथे झालेल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यांचीं विटंबना लक्षात घेऊन महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दगडफेक किंवा जाळपोळ करून नुकसान करण्यापेक्षा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे मिरज येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर वाचन करून आण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे शुद्धीकरण करण्यात आले.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी वाचन केले .
यावेळी बोलताना प्रा. सुभाष वायदंडे म्हणाले शासन आणि प्रशासन थोर महापुरुषांच्या पुतळ्यांचे रक्षण करण्यात कमी पडले असून भविष्यात अशा घटना घडल्या तर एकाही अधिकाऱ्याला व मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे, राज्य उपाध्यक्षा सुनीता खटावकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा नयना लोंढे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण, वरिष्ठ जिल्हा अध्यक्षा वनिता सोनवले जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा साबेरा इंगळे, शहर जिल्हाध्यक्षा शीलाबनसोडे, मिरज तालुका अध्यक्ष अनिल देवकुळे ,मिरज शहर अध्यक्षा मेहेक निशानदार,जिल्हा संघटक सुरेश वाघमारे, प्रविण भंडारे, इस्लामपूर शहराध्यक्षा शहनाज जमादार, इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिरज येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे संविधानाची उद्देशिका वाचून शुद्धीकरण करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे राजू दादा घाटगे सुनिता खटावकर व इतर*