Uncategorized

प्रतिकूल परिस्थितीत आपली मुले शिक्षित करणार्या “आदर्श आई” सौ..सुनिता विठ्ठल मस्के चा सन्मान कौतुकास्पद — जेष्ठ नेते रमेश राक्षे

आण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघ कुर्डूवाडी यांचे वतिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त देण्यात येणारा पुरस्कार प्रदान

सौ.सुनिता  व विठ्ठल मस्के ,जेष्ठ नेते रमेश राक्षे श्रीकांत कसबे व एन.एस.खंदारे व इतर 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सौ.सुनिता  व विठ्ठल मस्के , यांचा सत्कार  करताना  श्रीकांत कसबे व  जेष्ठ नेते रमेश राक्षे, एन.एस.खंदारे ,महादेव गायकवाड व इतर

पंढरपूर:-आईवडील स्व:त अडाणी असुन शेतमजूरी करुन आपले मुले विशेषत: मुली पदवीधर करुन स्वत:च्या पायावर उभे करणे हि अशक्य असणारी कामगिरी करणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीत आपली मुले शिक्षित करणार्या आदर्श “आई “चा सन्मान कौतुकास्पद आहे अशी भावना जेष्ठ नेते रमेश राक्षे यांनी व्यक्त केली.

जेष्ठ नेते रमेश राक्षे यांचा सत्कार करताना अॅड.अर्चना मस्के

ते पळशी ता.पंढरपूर येथील सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
आण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघ कुर्डूवाडी यांचे वतिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त देण्यात येणारा 2023 चा “आदर्श आई” पुरस्कार पळशी येथील सौ.सुनिता विठ्ठल मस्के यांना जाहीर झाला .तो पुरस्कार सौ.सुनिता विठ्ठल मस्के व विठ्ठल मस्के यांना रमेश राक्षे व श्रीकांत कसबे(संपादक सा.जोशाबा टाईम्स) यांचे हस्ते  सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, हार,साडी, टॉवेल ,टोपी देऊन प्रदान करण्यात आले.

मा.एन.एस.खंदारे यांचा सत्कार माजी उपसरपंच श्रीशैल पाटील  व इतर

हा कार्यक्रम मस्के यांचे निवासस्थानी संपन्न झाला.याप्रसंगी रमेश राक्षे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,मुलगा प्रा. रघुनाथ व मुली अॅड.अर्चना,विद्या,व वनिता यांचे शिक्षणासाठी त्यांचे आई वडीलांनी जे कष्ट केले याला तोड नाही.यांची प्रेरणा इतरांनी घेऊन आपली मुले सक्षम बनविली पाहिजेत. बार्टी चे वतिने जे सहकार्य लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.

सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष महादेव गायकवाड यांचा सत्कार करताना सरपंच रामचंद्र वाघमारे व इतर

मला शिक्षण घेता आले नाही याची खंत होती.त्यामुळेच माझी मुले शिकुन स्वत:चे पायावर उभारली पाहीजेत असे मनोमन वाटत होते.अनेक अडचणींवर मात करीत मुले जिद्दीने शिकली.ही  आनंदाची बाब आहे.यासाठी अनेकांनी पाठबळ दिले.अशा भावना सत्कारमुर्ती सौ.सुनिता विठ्ठल मस्के यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

विद्या मस्के   हिचा सत्कार करताना  श्रीकांत कसबे (संपादक सा.जोशाबा टाईम्स)   व  इतर

पुरस्कार समितीच्या वतीने संयोजक एन.एस.खंदारे यांनी सेवानिवृत्त संघाचा संकल्प सांगुन पुरस्कार का दिला याविषयी माहिती दिली.

वनिता मस्के   हिचा  सत्कार करताना  सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष महादेव गायकवाड  व  इतर

यावेळी आण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघ कुर्डूवाडी चे अध्यक्ष महादेव गायकवाड, शाम दाजी गोरे,(  सोन्या-चांदिचे व्यापारी कुर्डूवाडी )   पळशीचे सरपंच रामचंद्र वाघमारे,माजी उपसरपंच श्रीशैल पाटील, अॅड.अमर झांबरे,औदुंबर झांबरे, सिध्देश्वर झांबरे,अविनाश ताकतोडे(एनडीएमजे) आदी उपस्थित होते.

एनडीएमजेचे अविनाश ताकतोडे यांचा सत्कार करताना  एन.एस. खंदारे

प्रास्ताविक  एन.एस.खंदारे यांनी तर  सूत्रसंचालन  व आभार औदुंबर चव्हाण यांनी मानले.यावेळी अनेक  ग्रामस्थ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close