पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी साबेरा इंगळे

इस्लामपूर (ता.वाळवा जि.सांगली) येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वर्धापनदिनी सौ. साबेरा इंगळे यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करून सत्कार करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
कुरुंदवाड:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी कुरुंदवाड ता.शिरोळ (तोडकर गल्ली) येथील सौ. साबेरा रमजान इंगळे यांची निवड झाली असून पुरोगामी संघर्ष परिषदेचा इस्लामपूर येथे दुसरा वर्धापन दिन संपन्न झाला त्यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सुनिता खटावकर, राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, राज्य सल्लागार कमिटी सदस्य अंकुश शिंदे (मेजर ) ,राज्यसंसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र युवकचे कार्याध्यक्ष गणेश घाटगे, जिल्हा संघटक दौलत घाटगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कुमारी नयना लोंढे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू कांबळे, लखन वायदंडे, शोभा माळी,स्वप्नील बनसोडे,सर्जेराव भंडारे ,अक्षय खुडे, अधिक चव्हाण, वनिता सोनवले,शंकर चव्हाण, वनिता, सुकेशिनी साठे,रंजना जाधव, संजय केंगार, विठ्ठल नाटेकर, भिमाण्णा शिंदे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.