पंढरपूर पोटनिवडणूक मतमोजणी अनुषंगाने कलम १४४लागू:जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
कोविड१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दिले निर्देश

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-२५२पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी २मे२०२१रोजी होणार असुन कोविड१९विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने मतमोजणी साठी निवडणूक आयोग भारत यांचेकडून निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने व मतमोजणी प्रक्रिया शांततेत विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडणेकामी सोलापूर जिल्ह्यात(पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांची हद्द वगळून)मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर१/५/२०२१रात्री११:३०ते दि.२/५/२०२१ रोजीचे रात्री १२:००पर्यंत सोलापूर जिल्हा कलम१९७३ चे कलम १४४ करण्यात आलेचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
कलम १४४ अन्वये -१)निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका/रँली काढणे,गुलाल उधळणे,घोषणा देणे, फटाके फोडणे,बँनर/फ्लेक्स लावणेस बंदी करण्यात आली आहे.
२)निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवार किंवा त्यांचे अधिक्रुत प्रतिनिधी सह दोनपेक्षा जास्त व्यक्तींना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून निवडणूकीचे प्रमाणपत्र घेण्यास परवानगी रहाणार नाही.
३)पंढरपूर शहरात निवडणूक कामासाठी निर्गमित ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.(अत्यावश्यक सेवा वगळून)
४)मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषय अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवार यांचे अधिक्रुत प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी, व निवडणूक कार्यालयाकडून प्राधिक्रुत केलेले पासधारक व्यक्ती यांचे शिवाय इतर व्यक्तींना मत मोजणी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
५)मतमोजणी संपूर्ण परिसरात कर्मचारी सहित इतर व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
६)तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी,लायटर,ज्वालाग्रही पदार्थ, अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणी ठिकाणी घेउन जाणेस मनाई करण्यात आली आहे.
७)मतमोजणी परिसरात कोणत्याही प्रकारची शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.(पोलीस बंदोबस्त वगळून)
वरील आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड कलम१८८ प्रमाणे व इतर कायद्याच्या संबंधी कलमान्वये शिक्षेस पात्र राहील. याची नोंद घ्यावी असे आदेश आहेत.