Uncategorized
पंढरपूर पोटनिवडणूक ३६व्या फेरीपर्यंत काटे की टक्कर
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक १७मे रोजी झाली होती. त्याचा निकाल आज २मे रोजी होता मतमोजणीच्या ३६व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी चे उमेदवार भगिरथ भालके यांच्या वर ४१०२मताची आघाडी घेतली आहे. समाधान आवताडे यांना १,०४२८५मते मिळाली असुन भगिरथ भालके यांना १,००,१८३मते मिळाली असुन आणखी मतमोजणीच्या दोन फेर्या शिल्लक असुन हे लिड कमी होणार का? भाजपची विजयाकडे निघालेली घोडदौड सुरु असलेला रथ रोखला जाणार का? समाधान आवताडे विजयी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.